Pune News : पुणे-लातूर विशेष रेल्वे अखेर सुरू, या दिवसापासून होणार सुरुवात, अनेक ठिकाणी थांबा, बुकिंगचीही सोय…


Pune News  पुणे : मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पुणे ते हरंगुळ (लातूर) दरम्यान विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. १० ऑक्टोबर पासून ३१ डिसेंबर पर्यंत दररोज गाडी पुणे- हरंगुळ-पुणे अशी धावणार आहे. Pune News

पुण्याहून लातूरपर्यंतच्या प्रवाशांची नव्या रेल्वेमुळे सोय होणार आहे. पुणे येथून दररोज सकाळी ६.१० वाजता हरंगुळसाठी रेल्वे निघणार आहे. दुपारी १२.५० वाजता ही गाडी हरंगुळला येईल.

येथील स्थानकात जवळपास दोन तास थांबल्यावर पुन्हा परतीच्या प्रवासाला निघणार आहे. पुण्यासाठी दुपारी ३ वाजता येथून ही रेल्वे निघणार आहे. पुणे स्टेशन येथे रात्री ९ वाजता पोहचणार आहे.

मुंबईहून येणाऱ्या लातूर रेल्वेत अनेकदा पुण्याच्या प्रवाशांना जागा मिळत नव्हती. त्यामुळे स्थानकातून मध्यरात्रीच्या वेळी प्रवाशांना परत जावे लागत होते. आता मुंबईहून येणाऱ्या रेल्वेत जागा नाही मिळाली सकाळी पुण्याहून लातूरपर्यंतच्या प्रवाशांची नव्या रेल्वेमुळे सोय होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे-हरंगुळ-पुणे दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्र. ०१४८७ पुणे – हरंगुळ एक्स्प्रेस दिनांक १० ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत पुण्याहून दररोज ०६.१० वाजता सुटेल आणि १२.५० वाजता हरंगुळला पोहोचेल. मार्गात ही गाडी हडपसर ०६.२२, केडगाव ०६.४०, दौंड ०७.४२, जेऊर, केम, कुर्डूवाडी, बार्शी टाऊन आणि उस्मानाबाद येथे थांबेल.

गाडी क्र. ०१४८८ हरंगुळ – पुणे एक्सप्रेस दिनांक १० ते ३१ ऑक्टोबर दरम्यान हरंगुळ येथून दररोज १५.०० वाजता सुटेल आणि २१.०० वाजता पुण्याला पोहोचेल. मार्गात ही गाडी उस्मानाबाद, बार्शी टाउन, कुर्डुवाडी, केम, जेऊर, दौंड १९.३५ , केडगाव १९.४७ वाजता आणि हडपसर २०.४० वाजता थांबेल.

या गाडीला सामान्य श्रेणी ०३, स्लीपर०५, थ्री एसी०४, सेकंड एसी ०१ आणि फर्स्ट एसी01कोच असतील.वाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!