Pune News : पुण्यातील अर्भकाचा मृत्यूशी लढा, ‘तो’ भाग कापून रस्त्यात फेकला, घटनेने उडाली खळबळ..

Pune News : मुळशी तालुक्यात अकोले-शेरेगाव या दरम्यान असलेल्या पेट्रोल पंपाजवळील एका शेतामध्ये नागरिकांना २२ नोव्हेंबरला बेवारस अर्भक मिळून आले. अर्भकाच्या अंगावर जखमा होत्या. तसेच त्याचे गुप्तांग कापण्यात आल्याचेही दिसून आले.
पौड पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अर्भकाला उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवले. दरम्यान अर्भकाला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याचे गुप्तांग कापण्यात आले. तसेच अन्य जखमा केल्या असाव्यात. या शक्यतेने पौड पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune News
पौड पोलिसांनी अर्भकाला ससून रुग्णालयात दाखल केले. अर्भक दाखल झाले तेव्हा त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्याचे वजनही खूपच कमी होते. त्यामुळे अर्भक किती दिवसांचे असेल, याचे अंदाज डॉक्टरांना लावता येत नव्हता. गुप्तांग कापल्याने अर्भकाला मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला आहे. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ते व्हेंटिलेटरवर आहे, अशी माहिती ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
प्रथमदर्शनी गुप्तांग शस्रक्रिया करून काढण्यात आले आहे का, अशी शंका उपस्थित झाली आहे. मात्र, त्याबाबत ठोस सांगता येत नसल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. त्याबाबत ससून रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने देखील अद्याप काही कळवले नाही, असे तपास अधिकारी सहायक निरीक्षक स्वाती सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.