Pune News : इंस्टाग्रामवर डॉक्टर समजून प्रेमात पडली तरुणी, अन् तो निघाला…, तरुणीसोबत नको तेच घडले..


Pune News : पुण्यात फसवणुकीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील एका उच्च शिक्षित तरुणीला एका भामट्याने सोशल मीडियावर डॉक्टर असल्याचे सांगत प्रेमाचे नाटक करून पैसे उकळले.

त्याचे बिंग फुटल्यावर पीडित तरुणीला ब्लॅकमेल करून पोलिस भावाच्या नावे धमकावत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका तरुणीने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. Pune News

मिळालेल्या माहिती नुसार, पतीच्या अकाली निधनानंतर संबंधित फिर्यादी तरुणी माहेरी राहत आहे. तिला एक मुलगी आहे. इन्स्टाग्रामवर तिची ओळख डॉ. सैफ खान याच्याशी झाली.

नाशिक सिव्हिल रुग्णालयामध्ये नोकरीला असल्याचे सांगून त्याने तरुणीकडून प्रेमाची कबुली करून घेतली. तिच्या मुलीलाही सांभाळण्याची तयारी दाखविली.त्यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या.

शिवाजीनगर परिसरात लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांचे काम सुरु सध्या सुरू असून एका ग्रुपमध्ये डॉ. सैफ खान याचे छायाचित्र पाहिल्यावर मुलीने त्याला फोन केला. मला निवडणुकीचे काम दिल्याचे सांगून त्याने वेळ मारुन नेली.

त्याचा पत्ता मिळवून इतरांकडून माहिती घेण्यात आली. त्यावेळी या भामट्याला तीन मुले असल्याचे आणि तो डॉक्टर नसून बांधकामांच्या ठिकाणी कामे करीत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!