Pune News : पुण्यातील धक्कादायक प्रकार! ससून रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उंदीर चावल्यामुळे तरुणाचा मृत्यू, घटनेने उडाली खळबळ..


Pune News : आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या तरुणाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाला आहे. हा धक्कादायक प्रकार पुण्यातील ससून रुग्णालयातून समोर आला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे नातेवाईकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

सागर रेणूसे असे मृत्यू झालेल्या ३० वर्षीय तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, सागर रेणूसे नावाचा तरुण पुण्यातील भोर तालुक्यात अपघात झाला होता. त्यानंतर त्याला १६ मार्चला त्याला ससुन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं आणि आय सी यु मध्ये त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले. मात्र २६ मार्चला त्याची प्रकृती खालावत होती.

त्यानंतर नेमके काय झाले याचा शोध घेतला असता. उंदीर चावल्याचे समोर आले. हा प्रकार पाहून नातेवाईकांनी चांगलाच गोंधळ घातला. आय सी यु मध्ये त्याच्या डोक्याला, कानाला आणि इतर अवयवांना उंदराने चावा घेतला. त्यानंतर या तरुणाची प्रकृती खालावत जाऊन आज सकाळी त्याचं निधन झाले. Pune News

दरम्यान, त्याचं निधन झाल्यावर नातेवाईकांनी उंदीर चावल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काही वेळ डॉक्टरांनी नकार दिला. मात्र त्यानंतर डॉक्टरांनी सागर रेणुसेच्या शरीरवर उंदीर चावल्याच मान्य केले आहे. या प्रकारामुळे ससून रुग्णालयाच नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!