Pune News : डेटींग अ‍ॅपवर मैत्री, तरुण हॉटेलमध्ये भेटण्यासाठी गेला अन्….; पुण्यातील नऱ्हेत हादरवणारी घटना


Pune News पुणे : देशभरात जसा ऑनलाईनचा वापर वाढत आहे, अशातच फसवणुकीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आता पुण्यातून सध्या एक असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सीकिंग एडवेंचर या डेटिंग साईटवर अनोळखी मुलीशी चॅटिंग करणे एका ३६ वर्षीय व्यक्तीला चांगलेच महागात पडले. या मुलीने गोड बोलून या व्यक्तीला एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले आणि त्यानंतर त्याचे तब्बल ९०००० रुपये लुबाडले. Pune News

हा प्रकार पुण्यातील नऱ्हे परिसरातील हॉटेल पुणे गेट  येथे घडला आहे. याप्रकरणी एका ३६ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक तरुणी आणि एका पुरुषाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, सिकिंग एडवेंचर या डेटिंग ॲपच्या माध्यमातून फिर्यादी यांची एका तरुणीसोबत ओळख झाली होती. या तरुणीने फिर्यादीला स्वतःचे फोटो टेलिग्राम वर पाठवले आणि तुला भेटायचे आहे असे सांगितले.

तरुणीच्या प्रतिसादानंतर फिर्यादीने न-हे परिसरातील एका हॉटेलमध्ये रूम बुक केली आणि तिला भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेला. दरम्यान आरोपी तरुणी फिर्यादी तरुणाने बुक केलेल्या रूमवर आली. काही वेळ तिने फिर्यादी सोबत गप्पा मारल्या.

त्यानंतर तिने फिर्यादीला बारा हजार रुपये स्वतःच्या अकाउंट वर ट्रान्सफर करण्यास सांगितले. फिर्यादीने ते केलेही. त्यानंतर मात्र यात तरुणीची हाव आणखी वाढत गेली आणि तिने ३८ हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. यावेळी मात्र फिर्यादीने पैसे ट्रान्सफर करण्यास नकार दिला.

त्यावेळी अनोळखी महिलेचा मित्र खोलीत आला. त्याने फिर्य़ादी यांना मारहाण करुन जबरदस्तीने पैसे ट्रान्सफर करुन घेतले. तसेच फिर्य़ादी यांच्या हातातील सोन्याची अंगठी घेऊन दोघेजण निघून गेले. आरोपींनी फिर्य़ादी यांच्याकडून ९० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!