Pune News : ललित पाटील प्रकरणी निष्काळजीपणा आला अंगलट, पुण्यातील महिला पोलिस अधिकारी तडकाफडकी निलंबित, प्रकरण काय?


Pune News पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याने पुण्यातील ससून रुग्णालयातून पलायन केलं होतं. त्यानंतर दहा ते बारा दिवसांनंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आता या प्रकरणी पुणे पोलीस दलातील महिला सहायक पोलीस निरीक्षकाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. Pune News

सविता हनुमंत भागवत (नेमणुक कोर्ट कंपनी, मुख्यालय) असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. निलंबनाचे आदेश सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी गुरुवारी (ता.२६) काढले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, सविता भागवत यांची नेमणूक ससून हॉस्पिटलमध्ये करण्यात आली होती. भागवत यांनी ससून हॉस्पिटलमधील वॉर्ड क्रमांक १६ मध्ये उपचार घेत असलेल्या बंदी आरोपींची झडती घेणे आवश्यक असताना त्यांनी झडती घेतली नाही. गुन्हे शाखेला आरोपी ललित पाटील याच्याकडे दोन मोबाईल आढळून आले.

तसेच देखरेख अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत असताना एक खासगी व्यक्ती आक्षेपार्ह सॅक घेऊन आरोपी ललित पाटील याला भेटण्यास गेला. कर्तव्यात निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व बेजबाबदारपणा केल्याने ललित पाटील याला पळून जाण्यास संधी मिळाल्याचा ठपका ठेवत सविता भागवत यांनी निलंबित केले आहे.

तसेच महिला सहायक पोलीस निरीक्षक सविता हनुमंत भागवत यांनी महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यातील नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे पुणे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाली आहे. निलंबन कालावधीत खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. तसेच मुख्यालय सोडण्यापूर्वी अपर पोलीस आयुक्त, प्रशासन व पोलीस उपायुक्त मुख्यालय यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

दरम्यान, निलंबन कालावधीमध्ये दररोज राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय यांच्याकडे हजेरी द्यावी लागेल. निलंबन काळात खाजगी नोकरी किंवा धंदा करत नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. प्रमाणपत्र दिल्यानंतर निर्वाह भत्ता दिला जाईल. असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!