Pune News : ‘मला तुम्ही खूप आवडताय, जरा…, रिक्षाचालकाकडून प्रवासी महिलेचा विनयभंग, औंध परिसरातील घटना..

Pune News पुणे : पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. मला तुम्ही खूप आवडताय, जरा माझयजवळ पुढे बसायला या ना’, असे म्हणत रिक्षाचालकाने प्रवासी महिलेचा विनयभंग केला. Pune News

ही घटना औंध भागात घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. महिलेचा विनयभंग करुन पसार झालेल्या रिक्षाचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. Pune News


रियाज समाद शेख (रा. बोपोडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, तक्रारदार महिला ओैंधमधील ब्रेमेन चौकातून रिक्षाने निघाली होती. तिला खडकी परिसरात जायचे होते. आरोपी रिक्षाचालक शेखने आरशातून महिलेकडे पाहून तिला डोळा मारला. तिच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, घाबरलेल्या महिलेने आरडाओरडा केला. रिक्षाचालक शेखने रिक्षा थांबविली. महिलेला रस्त्यात सोडून रिक्षाचालक पसार झाला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.
