Pune News : आता डॉक्टरांचे क्लिनीकही असुरक्षित! पुण्यात तपासणीसाठी गेलेल्या तरूणीसोबत अश्लील चाळे, न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरवर गुन्हा दाखल…
Pune News : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मायग्रेनचा त्रास होत असल्याने तपासणीसाठी क्लिनिकमध्ये गेलेल्या तरूणीसोबत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याची घटना स्वारगेट परिसरात घडली आहे. हा प्रकार बुधवार (ता. २९) न रोजी मुकूंदनगर येथे सायंकाळी सव्वा सहा ते साडेसहा या दरम्यान घडला आहे. Pune News
याप्रकरणी आंबेगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या तरूणीने गुरुवारी (ता.३०) स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार डॉ. श्रीपाद पुजारी (रा. बिझनेस कोर्ट, मुकूंदनगर, स्वारगेट) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी श्रीपाद पुजारी हे न्यूरोलॉजिस्ट असून त्यांचे मुकूंदनगर येथील बिझनेस कोर्ट येथे क्लिनिक आहे. फिर्यादी तरूणीला मायग्रेनचा त्रास होत असल्याने त्या डॉ. पुजारी यांच्या क्लिनिकमध्ये बुधवारी सायंकाळी तपासणीसाठी गेल्या होत्या.
त्यावेळी आरोपी पुजारी याच्या केबिनमध्ये कोणतीही महिला अटेंडन्ट नव्हती. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्याकडे पाहून अश्लील बोलून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कीर्ती चाटे करीत आहेत.