Pune News : पुणे हिट अँड रन प्रकरणातील विशाल अग्रवाल नक्की आहेत कोण? संपत्तीबाबत मोठी माहिती आली समोर…


Pune News : अल्पवयीन मुलाने दारू पिऊन, गाडी चालवून दोघांना उडवल्याचे हे प्रकरण सध्या फक्त पुण्यातच नव्हे तर राज्यभरात गाजत असून अवघ्या काही तासांतच त्याला जामीन मिळाल्यानेही संताप व्यक्त होत आहे.

अल्पवयीन तरूणाने मद्यप्राशन करून दुचाकीला धडक दिली. कारचालक अल्पवयीन असल्याने त्याचे वडील विशाल अग्रवाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्याला अटकही करण्यात आली आहे. विशाल अग्रवाल हा पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर आहे.Pune News

विशाल अग्रवाल कोण आहेत?

‘ब्रम्हा कॉर्प’ या रिअल इस्टेट विकास कंपनीशी विशाल अग्रवाल संबंधित आहेत. ते पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रात त्यांचं मोठं नाव आहे. ब्रम्हा मल्टीकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ते संचालक आहेत.

‘ब्रम्हा कॉर्प’ ही पुण्यातील नामांकित रिअल इस्टेट कंपनी आहे. ब्रम्हदत्त अगरवाल हे ‘ब्रम्हा कॉर्प’चे संस्थापक आहेत. रामकुमार अगरवाल, विनोद कुमार अगरवाल, दिनेश अगरवाल, हिमांशू अगरवाल, करण अगरवाल, विशाल अग्रवाल हे या कंपनीत संचालक आहेत.

विशाल अग्रवाल यांची संपत्ती किती?

ब्रम्हा कॉर्पने पुण्यात आणि मुंबईत दोन हजाराहून अधिक इमारतींचं बांधकाम केले आहे. पुण्यातील प्रसिद्ध सनसिटी प्रोजेक्ट ब्रम्हा कॉर्पचाच आहे. २००३ ला हा प्रोजक्ट सक्सेसफुल झाला. त्यानंतर ब्रम्हा कॉर्प नावाजले जाऊ लागले.

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात त्यांचे सर्वाधिक प्रोजक्ट्स आहेत. विशाल अग्रवाल यांना अलिशान गाड्यांची विशेष आवड आहे. विशाल अग्रवाल यांच्या मालकीच्या विविध कंपन्यांची मालमत्ता ही ६ कोटी १ लाख २० हजार इतकी आहे

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!