Pune News : ते बनवत होते हॅपी बिर्थडेच्या स्पार्कल्स, पण झाला घात, ६ जणांनी गमावला जीव, पुण्यातील घटना…


Pune News : पुण्यात हॅपी बर्थडे साठी स्पार्कल बनवण्याचा कारखाना पेटल्याने यामध्ये होरपळून सहा जणांचा मृत्यू झाले तर, आठ जण जखमी झाल्याची माहिती आहे. ही घटना पिंपरी चिंचवड नजीकच्या तळवडे एमआयडीसीत येथे घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

उषा पाडवी, कमल चोरे, सुमन राधा, अपेक्षा तोरणे, शरद सुतार, प्रियंका यादव, कविता राठोड, रेणुका तातोड हे आठ जखमी कामगार जीव वाचवण्यात यशस्वी झाले. त्यांच्यावर सध्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. Pune News

यावेळी कारखान्यांमध्ये वीस ते पंचवीस कामगार काम करत होते. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून, या ठिकाणी आणखीही कामगार अडकलेत का, याची शोध मोहीम सुरू आहे. आणखी कोणी जखमी आहेत का याचीही माहिती घेतली जात आहे. या घटनेने पुन्हा एकदा पुणे हादरलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!