Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी पाणी पुरवठा राहणार बंद, पाणी जपून वापरण्याचे अवाहन…


Pune News : पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. आता पुणे शहरातील नागरिकांना एक दिवस पाणी जपून वापरावे लागणार आहे. कारण पुण्यात येत्या गुरुवारी म्हणजेच १२ डिसेंबरला संपूर्ण शहरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

याशिवाय शुक्रवारी म्हणजेच १३ डिसेंबरला देखील शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व जलशुद्धीकरण केंद्रामध्ये देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे.

गुरुवार, १२ डिसेंबर रोजी ही देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे गुरूवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहील. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. Pune News

कोणत्या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद?

पर्वती नवे व जुने जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत एमएलआर, पर्वती एलएलआर टाक्या, लष्कर जलकेंद्र, पर्वती एचएलआर, पर्वती टँकर पॉइंट, चांदणी चौक टाकी परिसर, नवे व जुने होळकर जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र, भामा आसखेड जलकेंद्र, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी, वारजे जलकेंद्र, वारजे जलकेंद्र जीएसआर टाकी व एचएलआर परिसर, चतुःशृंगी टाकी, एसएनडीटी एमएलआर, कोंढवे धावडे टाकी व त्यावर अवलंबून असलेल्या परिसरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद राहणार आहे.

पाणी जपून वापरण्याचे अवाहन…

महापलिकेंतर्ग येणाऱ्या शहरातील सर्व जलशुद्धीकरण-पाणीपुरवठा केंद्रात तातडीने देखभाल दुरुस्तीची कामे करणे अवश्यक आहे. या दुरुस्ताच्या कामांमुळे संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल. या कामादरम्यान म्हणजेच गुरूवारी पाणीपुरवठा यंत्रणा बंद ठेवावी लागणार आहे.

त्यामुळे गुरुवारी शहराला पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने या दिवशी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पाणीपुरवठा केला जाईल. पण हा पुरवठा कमी दाबाने होईल, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!