Pune News : खासगी गाडीवर लाल दिवा भोवला, पुण्यातील IAS अधिकारी पूजा खेडकर यांची बदली, काय आहे प्रकरण?


Pune News : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्तीस असलेल्या ‘प्रोबेशन’ कालावधीत महिला आयएएस अधिकाऱ्याकडून नियम धाब्यावर बसविले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. आपल्या ‘व्हीआयपी’ नंबर असलेल्या खासगी ‘ऑडी’ गाडीला त्यांनी लाल-निळा दिवा लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता.

ही महिला अधिकारी एवढ्यावर थांबली नाही तर एका अधिकाऱ्याच्या ‘अ‍ॅण्टी चेंबर’मध्ये आपले आलिशान कार्यालय थाटले. तिथे आपल्या नावाची पाटीदेखील लावली. त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा त्यांचाच रूबाब भारी असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

पुण्यातील रूबाबात चमकोगिरी करणाऱ्या अधिकारी पूजा खेडकर यांची राज्य सरकारने थेट वाशिमला बदली केली आहे. असे आरोप समोर आलेल्या नंतर पुणे जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झालेल्या पूजा खेडकर यांची अखेर उचलबांगडी करून वाशिममध्ये बदली करण्यात आली आहे. Pune News

या अधिकारी कोण आहेत?

खेडेकर या २०२३ बॅचच्या ‘आयएएस’ अधिकारी आहेत. जून २०२३ पासून त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हा देण्यात आला होता. मात्र, त्यांनी नियुक्तीपासूनच अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या सुरू केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अहमदनगरमधील पाथर्डी येथील असलेल्या पूजा खेडकर या माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत.

दिलीप खेडकर हे प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत. सेवानिवृत्त झाल्यानंतर वंचित आघाडीच्या पाठिंब्यावर दिलीप खेडकर यांनी अहमदनगर दक्षिणमधून २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. तर, पूजा खेडकर यांच्या आई डॉ. मनोरमा खेडकर या देखील भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!