Pune News : ओला, उबेरला मोठा धक्का! वाहतूक परवाना पुणे ‘आरटीए’ने फेटाळला, आता सेवा मिळणार का? जाणून घ्या..
Pune News : ओला, उबरचा वाहतूक करणाऱ्यांना ‘आरटीए’ धक्का दिला आहे. ओला, उबरचा वाहतूक परवाना पुण्यात ‘आरटीए’ने फेटाळला आहे. या विरोधात अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे. तसेच याकाळात त्यांना प्रवासी वाहतूक सुरू ठेवता येईल.
शहरातंर्गत प्रवासी वाहतुकीसाठी ॲग्रीगेटरचा परवाना मिळावा, यासाठी ओला आणि उबर या कॅब कंपन्यांनी केलेला अर्ज प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) फेटाळला. या निर्णयाच्या विरोधात दोन्ही कॅब कंपन्यांना ३० दिवसांत राज्य वाहतूक प्राधिकरनाकडे अपिल करता येणार आहे.
सेंट्रल मोटर व्हेईकल ॲग्रीगेटर पॉलिसी २०२० अंतर्गत पार्टनर कॅब चालकांचा आरोग्य विमा काढणे, त्यांचा जीवनविमा काढणे, त्यांना नियमितपणे प्रशिक्षण देणे, कॅबचालकांना सलग १२ तासांनंतर त्यांना वाहतूक करता येणार नाही. यासाठी तांत्रिक बंधन घालणे या विविध तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल दोन्ही कॅब कंपन्यांचा ॲग्रीगेटरचा परवाना मिळावा, यासाठीचा अर्ज फेटाळला आहे.
दोन्ही कॅब कंपन्यांना राज्य सरकारच्या प्राधिकरणाकडे ३० दिवसांत अपील करता येईल. दरम्यानच्या काळात त्यांना त्यांची वाहतूक सुरू ठेवता येईल. मुंबईतही कॅब कंपन्यांचा ॲग्रीगेटरचा परवाना मिळण्याचा अर्ज तेथील ‘आरटीओ’ सध्या प्रलंबित आहे. Pune News
दरम्यान, पुण्यासह इतर शहरातदेखील ओला, उबेर टॅक्सी मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. अनेकांना ही टॅक्सी सोयीची ठरते. त्यामुळे अनेकजण ओला- उबेर टॅक्सीवा प्राधान्य देत असतात. शहरात ७५ टक्के लोक ओला उबेरचा वारत करतात.
त्यासोबतच बाकी काही ५ कंपन्यांकडून ही ओला- उबेरसारखी सेवा पुरवली जाते. मात्र त्यांनी कोणत्याही प्रकरचा परवाना काढण्यासाठी आरटीएकडे अर्ज केला नसल्याचं दिसून आलं आहे.
ओला उबेर चालकांचा परवाना जरी आरटीएने फेटाळला असला तरीही प्रवाशांची मात्र गैरसोय होणार नाही आहे. अपील ३० दिवसांची मुदत देण्यात आहे. या ३० दिवसांत ओला उबेरची सेवा मात्र सुरु असणार आहे.