Pune News : तेच खरे पुणेकर!! पुण्यातील रस्ते झाले पूर्ण मोकळे, दिवाळीनिमित्त लोकं बाहेर पडल्याने ट्रॅफिक गायब…


Pune News पुणे : रविवारी पुण्यात दिवाळीतील महत्वाचा सण लक्ष्मीपूजन जल्लोषात साजरे करण्यात आले. उद्या पाडव्याची तयारी करण्यासाठी उत्सुकता आहे. ज्या ट्रॅफिकने पुणेकर हैराण असतात, मात्र आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वातावरण बदलले दिसत आहे. कारण पुण्यातील रस्ते पूर्णपणे मोकळे दिसत आहे.

याच कारण म्हणजे पुण्यातील बाहेरचे स्थायिक होतात, काही विद्यार्थी येतात तर, काही नोकरीसाठी पुण्यात येतात. मात्र ते आता दिवाळी साजरी करण्यासाठी आप- आपल्या घरी गेल्यामुळे नेहमीच पुण्यातील गजबजलेले रस्ते आणि जे पुण्यातील ट्राफिक आहे ते आता पूर्ण रिकामे झालेले दिसून येत आहे. Pune News

पुण्यातील अतिशय महत्वाचं चौक म्हणजेच अलका चौक, टिळेकर चौक, लक्ष्मी रोड हे नेहमी गजबजलेले असतात. कायम या रोडवर गर्दी असते. मात्र आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर देखील यासाठी गर्दी कमी दिसत आहे.

गाड्या एकदम सुरळीतपणे जात आहे. यामुळे पुणेकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. तसेच ट्राफिक पोलिसांचा बोजा देखील थोडा कमी झाला आहे. यामुळे आता जे पुण्यात आहेत ते खरे पुणेकर असल्याचे सांगितले जात आहे.

पुण्यात एकीकडे हे दृश्य आहे, रस्ते रिकामे आहेत, तर दुसरीकडे असेही पाहायला मिळत आहे की, काल लक्ष्मीपूजन च्या दिवशी फटाक्यांचा प्रमाण खूप मोठ्या प्रमाणे असल्याने पुण्यातील हवेलीत गुणवत्ता मोठ्या प्रमाणत ढासळलेली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!