Pune News : पुणेकरांची होणार गैरसोय, आज ना ओला-उबर, ना स्विगी-झोमॅटो, ऑनलाइन सेवा देणाऱ्यांच काम राहणार बंद…

Pune News पुणे : पुणे शहरात बाहेरगावावरुन आलेले अनेक विद्यार्थी आणि नोकरी करणारे युवक-युवती आले आहेत. या सर्वांमध्ये स्विगी आणि झोमॅटो चांगलेच लोकप्रिय झाले आहे. विविध पदार्थांची ऑर्डर बुक करुन घरात पार्सल मागवून जेवण अनेक जण करतात.
तसेच रिक्षा चालकांची वाट बघण्यापेक्षा आपल्या मोबाइलने ओला, उबेर बुक करणारे अनेक पुणेकर आहेत. या सर्वांची आता अडचण होणार आहे. Pune News
कारण, पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील ओला, उबर, स्विगी, झोमॅटो, पोर्टर, अर्बन कंपनी सारख्या मोबाईल ॲप्लिकेशन वर काम करणारे कॅब, रिक्षाचालक व बाईक डिलिव्हरी तरुण आणि तरुणी बुधवारी (ता. २५) म्हणजेच आज बंद पाळणार आहेत.
कंपन्यांकडून होणारी कामगारांची पिळवणूक थांबावी यासाठी राजस्थान सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील गिग कामगार नोंदणी आणि कल्याणकारी कायदा लागू करावा, यासाठी हा बंद पाळण्यात येणार आहे.
या बंदमुळे ओला, उबेरच्या माध्यमातून चालणाऱ्या कार, टू व्हीलरवरुन होणारी स्विगी आणि झोमॅटोची डिलिव्हरी पुण्यात बंद राहणार आहे. इंडियन गिग वर्कर्स फ्रंट या संघटनेतर्फे या बंदचे आयोजन करण्यात आलं आहे.
ओला, उबेर, स्विगी, झोमॅटो यासारख्या कंपन्यांसाठी काम करणारे कॅब आणि रिक्षा चालक आणि पुणे शहरातील झोमॅटो आणि स्विगीची डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.
२५ ऑक्टोबर रोजी हा बंप पुकारण्यात आला आहे. राजस्थानमधील कामगार संरक्षण कायद्याप्रमाणे महाराष्ट्रात कायदा करण्याच्या मागणीसाठी बंद करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी लाभ देण्यासाठी कायदा हवा आहे.