Pune News : पुण्यात आता ‘हा’ सर्वात मोठा उत्सव होणार डीजे अन् लेझरमुक्त, कोणी घेतला निर्णय, जाणून घ्या…

Pune News पुणे : पुणे शहरात डीजे आणि लेझरमुक्त आंबेडकर जयंती साजरी करण्याचा निर्धार शुक्रवारी आंबेडकरी जनतेने केला. तसेच पुणे शहरासह राज्यातील विविध शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आगामी जयंती डीजे आणि लेझरमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. Pune News
यासाठी सर्वत्र जनजागृती करण्यात येणार आहे. पुणे शहरातील संबंधित मंडळांमध्ये डीजे आणि लेझरचा वापर या वर्षीपासून बंद करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. पुणे शहरातील विविध मंडळे आणि विहारांना भेट देऊन आंबेडकर जयंतीमध्ये डीजेचा वापर करू नये, असे मतपरिवर्तन करण्यात येणार आहे.
पुणे शहर डॉल्बीमुक्त आंबेडकर जयंती साजरी करण्यासंदर्भात विचारमंथन करण्यासाठी आयोजित चर्चासत्रात हा निर्णय घेण्यात आला. लेझर आणि डीजेचे होणाऱ्या दुष्परिणामामुळे हा निर्णय घेण्यात आला. आंबेडकरी जनतेने घेतलेल्या या निर्णयाचे पुणेकरांकडून स्वागत करण्यात येत आहे.
गणेश मंडळांनी लावलेल्या डीजेमुळे आवाज वाढला होता. या सर्वांचा त्रास त्या भागातील रहिवाशांना झाला तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनाही झाला.
गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर अनेक कार्यकर्ते डोळे आणि कानाच्या तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे गेले. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर डॉल्बीमुक्त करण्यासाठी शुक्रवारी पावले उचलली गेली.