Pune News : पुणे शहरात ऐन दिवाळीत चोरट्यांचा दरोड्याचा प्रयत्न, सराफ दुकानाला केलं लक्ष अन्…
Pune News : पुणे शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली असून पुण्यात चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. शहरात घरफोडी, जबरी चोरी आणि वाहनचोरीच्या गुन्ह्यांत पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
तसेच ऐन दिवाळीत आंबेगाव पठार येथील त्रिमूर्ती चौकातील एका सराफ पेढीवर दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील सातजणांना पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून पिस्तूल, जिवंत काडतुसे, मिरची पावडर, मोबाईल, दुचाकीसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहेत. आरोपी विशीतील असून, अन्य दोघेजण अल्पवयीन आहेत. Pune News
अर्जुन मोहन बेलदरे (वय. २०), तुषार दिलीप माने (वय. १९, दोघे रा. आंबेगाव बुद्रूक), राधेमोहन सीताराम पिसे (वय. १९, रा. वारजे माळवाडी), समीर ज्ञानेश्वर मारणे (वय. २०, रा. नऱ्हे गाव), यश मनोज लोहकरे (वय. १९, रा. आंबेगाव पठार), अनिल दिलीप माने (वय. २०) आणि ओंकार ऊर्फ मयूर दादासाहेब माने (वय. २०, रा. आंबेगाव बुद्रूक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस हवालदार चेतन गोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपींनी ऐन दिवाळीत आंबेगाव पठार येथील त्रिमूर्ती चौकातील एका सराफा पेढीवर दरोडा टाकण्याचा प्लान आखला होता. ही टोळी बुधवारी रात्री त्रिमूर्ती चौकातील आंबेगाव पठार येथील राजे चौकात दबा धरून बसली होती. याबाबत खबऱ्यांकडून माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली.