Pune News : मानसिक त्रासातून गरोदर महिलेची आत्महत्या! पतीसह तिघांवर गुन्हा दाखल, घटनेने पुणे हादरलं…


Pune News : पुण्यातील चंदननगर परिसरातील खराडी येथे एका विवाहित गरोदर महिलेने सासरच्या लोकांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल करुन सासऱ्याला अटक केली आहे. हा प्रकार मे २०२३ ते आजपर्यंत राघोबा पाटीलनगर, खराडी येथे घडला आहे.

प्रणिता आकाश गायकवाड (वय.२२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकणी मयत प्रणिताचे काका नचिकेत शिवाजी भोसले (वय.४० रा. किंगस्टन एलिशिया सोसायटी, पिसोळी) यांनी गुरुवारी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पती आकाश गायकवाड (वय.२६), सासु लक्ष्मीबाई गायकवाड (वय.४५), सासरे अंकुश गायकवाड (वय.५०) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अंकुश गायकवाड यांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांची पुतणी प्रणिता हिचा विवाह आकाश याच्यासोबत २१ मे २०२३ रोजी झाला होता. लग्नानंतर दोन महिन्यांनी प्रणिताचा पती व इतर आरोपींनी संगनमत करुन छोट्या कारणावरुन प्रणिताला त्रास देण्यास सुरुवात केली. तुला स्वयंपाक नीट येत नाही, लग्न मोठे करुन दिले नाही, लग्नात मानपान केला असे बोलून मानसिक त्रास दिला. Pune News

तसेच ती गरोदर असताना डोहाळ जेवण मोठे करुन द्या अशी मागणी आरोपींनी केली. मात्र, माहेरची परिस्थिती गरीब असल्याने त्या गोष्टीचे प्रणिताने टेन्शन घेतले. यातूनच तिने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हंबीर करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!