Pune News : मोठी बातमी! पुण्यातील भाजपच्या युवा नेत्याची रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या, राजकारणात खळबळ…

Pune News पुणे : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील भाजप युवा नेत्याने टोकाचा निर्णय घेतला आहे. हडपसर परिसरात असणाऱ्या साडेसतरा नळीमध्ये ते राहत होते.
भारतीय जनता पार्टीचे हडपसर युवा मोर्चाचे सरचिटणीस सुनील मधुकर धुमाळ यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अजूनही समजू शकले नाही. Pune News
आत्महत्या केलेल्या ठिकाणी कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही. ही धक्कादायक घटना काल मंगळवारी सकाळी उघडकीस घडली आहे. पुणे रेल्वे पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
सुनील धुमाळ यांची एक ॲक्टिव्ह नेता अशी ओळख होती. त्यांच्या जाण्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे आई, वडील, पत्नी आणि मुले असा परिवार आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास हडपसर पोलीस आणि रेल्वे मार्ग पोलीस करत आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. Pune News