Pune News : मित्रांसोबत पोहायला गेला अन् क्षणात झालं होत्याच नव्हतं, तळेगावमध्ये विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू…


Pune News : राज्यातील विविध नद्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध नद्यांमध्ये बुडून मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी अहमदनगरजवळ प्रवरा नदीत एसडीआरएफ जवानांची बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली होती.

यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच तळेगावमध्ये विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अनिकेत घनश्याम तिवारी असे बुडालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महावितरण कार्यालयाशेजारील तळ्यातील पाण्यात बुडून आंबी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. Pune News

       

दोन मित्र आणि एका मैत्रिणीसह महावितरण कार्यालयाशेजारील तळ्यात बोटिंग करण्याच्या उद्देशाने गेला होता. मात्र बोट क्लब बंद असल्याने ते चौघे बोटी शेजारच्या पाण्यात उतरले.

दरम्यान, अनिकेत हात-पाय मारत पुढे गेला. मात्र खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. बाकीच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला.

मात्र अनिकेत पाण्यात बुडाला. वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा, आयएनएस शिवाजी आदींच्या बचाव पथकास पाचारण करण्यात आले.

शोधपथकांनी मृतदेहाचा शोध घेतला. त्यानंतर अनिकेतचा मृतदेह शोधण्यात यश आले. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात शव विच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!