Pune News : हॅलो कपिल शर्मा बोलतोय, १० वेळा आला फोन अन् अश्लील बोलून महिलेचा विनयभंग..
Pune News : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुण्यातील महिलेच्या फोनवर वारंवार फोन करुन तिला कपिल शर्मा बोलत असल्याचे सांगून तिच्यासोबत अश्लील बोलून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
तसेच या महिलेच्या पतीने याबाबत जाब विचारला असता महिलेबाबत अश्लील टिप्पणी केली. हा प्रकार बुधवारी (ता.२२) पावणे बारा ते एकच्या दरम्यान महिला काम करत असलेल्या कल्याणीनगर येथील कार्यालयात घडला आहे. Pune News
याप्रकरणी कपिल शर्मा नाव सांगणाऱ्या 8757709246 या मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी घोरपडी येथे राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात गु रुवारी (ता. २३) फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी महिला कल्याणीनगर येथील कार्यालयात काम करत होत्या. त्यावेळी आरोपीने महिलेला तिच्या मोबाईलवर तब्बल 10 वेळा फोन केला. ‘मै कपिल शर्मा बात कर रहा हूँ, पहचाना नही क्या? उस दिन तो नाईट को ओयो हॉटेल में मिले थे, दीपक है क्या?’ असे बोलून तिचा विनयभंग केला. यानंतर महिलेने याबाबत पतीला सांगितले.
दरम्यान, तिच्या पतीने आरोपीला फोन करुन याचा जाब विचारला. त्यावेळी आरोपीने ‘तेरी वाईफ ओयो मे जाती है, गलत काम करती है, उसको देखो’ असे बोलून त्यांना देखील अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेकजा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.