Pune News : पुणेकरांनो काळजी घ्या! डेंग्यूची साथ वाढली, खाजगी रुग्णालयात वाढले पेशंट..


Pune News पुणे : पुण्यात डेंग्यूच्या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांची नोंद होत आहे. यंदाही डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, विशेषत: खासगी रुग्णालयांमध्ये लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये डेंग्यूचे मोठ्या प्रमाणात निदान होत आहे. Pune News

रुग्णालयात अ‍ॅडमिट होणार्‍यांमध्येही सुमारे ३०-४० टक्के रुग्ण डेंग्यूचे असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. अंगदुखी, थकवा, अशक्तपणा अशी लक्षणे जाणवत असल्याने डॉक्टरांकडे येणा-या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.

तीन ते पाच दिवसांहून अधिक काळ लक्षणे कायम राहिल्यास रक्ताची तपासणी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असा सल्ला जनरल फिजिशियन डॉ. अनिकेत देशपांडे यांनी दिला आहे.

रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास रुग्णांना अ‍ॅडमिट करण्यास सांगितले जाते. औषधोपचार पूर्ण होऊन डिस्चार्ज दिल्यानंतरही डेंग्यूच्या रुग्णांमध्ये बरे होण्यासाठी जास्त कालावधी लागत आहे. ऑक्टोबर महिन्यातील वातावरणातील आर्द्रता आणि उष्णतेमुळे डासांसाठी आदर्श प्रजनन स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

डेंगू आजार होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी..

घरातील डास कमी करण्यासाठी घरातील भांड्यांमधील पाणी कमी किमान दोनदा बदला. घरामधील पाणी गळती थांबवण्यासाठी उपाय करा. घराभोवती पाणी साचू देऊ नका. वैयक्तिक सुरक्षेसाठी डास प्रतिबंधक जाळी वापरा. घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. घरामध्ये आणि आजूबाजूला न वापरलेल्या किंवा अनावश्यक वस्तूंची योग्य विल्हेवाट लावा. घरामध्ये आणि आजूबाजूला मच्छरदाणी आणि कीटकनाशक वापर करा.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!