Pune News : पीएमपी बसला बाप्पा पावला! गणेशोत्सवात झाली रेकॉर्डब्रेक कमाई, कर्मचारी खुश..
Pune News पुणे : पुणे शहराची महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून ‘पीएमपी’कडे (PMPML) पाहिले जाते. दिवसभरात जवळास दहा ते बारा लाख पुणेकर पीएमपी (PMPML) बसमधून प्रवास करतात. आता ‘पीएमपी’ कर्मचाऱ्यांमध्ये आनंदचे वातावरण आहे. कारण, पुणे महानगर परिवहन महामंडळाने गणेशोत्सवात घसघशीत कमाई केली. Pune News
गणपती उत्सवाच्या काळात पीएमपी (PMPML) प्रशासनाला तब्बल १९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पीएमपीचे उत्पन्न तब्बल २४ लाखांनी वाढले. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ‘पीएमपी’कडून १६५० बसच्या माध्यमातून ३७१ मार्गांवर सेवा दिली जाते.
यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान पुण्यात रात्रभर (Pune News) ‘पीएमपी’ बससेवा सुरू होती. त्यामुळे भाविकांना वेळेवर बाप्पाचे दर्शन घेता आले आहे. कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र न बघता ‘पीएमपी’ सेवा सुरळीत ठेवली. गणेशोत्सवात पुणे शहरासह उपनगरात ‘पीएमपी’च्या ६७२ अतिरिक्त बस सुरू होत्या.
दरम्यान, या बसेसच्या माध्यमातून पीएमपी प्रशासनाला तब्बल १९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.