Pune News : पुण्यातील आपटे रोडवर धक्कादायक प्रकार, तोंडावर लाल तिखट टाकून तरुणाच्या गळ्यावर वार…

Pune News पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी एका तरुणाच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करुन गंभीर जखमी केले. हा प्रकार आपटे रोडवर रविवारी (ता.४) रात्री साडे अकराच्या सुमारास घडला आहे.
याप्रकरणी शशांक दिलीप शिरोळे (वय.३१ रा. कमल निवास, आपटे रोड, पुणे) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

मिळालेल्या माहिती नुसार, रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास शशांक शिरोळे हे त्यांच्या घराच्या गेटजवळ थांबले होते. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ आल्या. Pune News
त्यांनी काहीएक कारण नसताना शशांक यांच्या तोंडावर लाल तिखट टाकून धारदार हत्याराने गळ्यावर वार करुन जखमी केले. याप्रकणी अनोळखी व्यक्तींवर व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत करीत आहेत.