Pune News : मोठी बातमी! पुण्यातील ससून रुग्णालयात राजकीय नेत्यांचा राडा! भाजपच्या आमदाराने राष्ट्रवादीच्या नेत्याला थेट कानशीलातच लगावली…

Pune News : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात राडा झाला आहे. भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीचे वैद्यकीय मदत सेलचे प्रमुख जितेंद्र सातव यांच्या कानशिलात लगावल्याची माहिती आहे.
ससून रुग्णालयातील उद्घाटन पाटीवर नाव नसल्याने कांबळे यांनी संतप्त झाले. त्यानंतर हा राडा झाल्याची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून ससून रुग्णालय चांगलेच चर्चेत आहे.
पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय या ठिकाणी शुक्रवारी सकाळी आज एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. Pune News
दरम्यान, उद्घाटनाच्या पाटीवर आमदार सुनील कांबळे यांचे नाव न टाकल्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. यावेळी कांबळे यांनी राष्ट्रवादीचे वैद्यकीय मदत सेलचे प्रमुख जितेंद्र सातव यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते.