Pune News : पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या, पुण्यातील घटना…


Pune News : स्वारगेट पोलिस वसाहतीत वास्तव्यास असलेल्या पोलिस पत्नीने ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (ता.६ ) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली आहे

ज्योती कैलास बर्डे (वय. १९) असे आत्महत्या केलेल्या पोलिस पत्नीचे नाव आहे. दरम्यान, ज्योती यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून केली, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती बर्डे यांचे पती कैलास हे पुणे शहर पोलिस दलात कार्यरत आहेत. ज्योती या पतीसोबत स्वारगेट येथील कर्मचाऱ्यासाठी असलेल्या शासकीय निवासस्थानात राहत होत्या. शुक्रवारी (ता.६) दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. Pune News

ज्योती यांनी जेव्हा गळफास घेतला तेव्हा त्यांचा भाऊ घरी होता. याबाबत खडक पोलिसांना माहिती देण्यात आली होती. उपचारासाठी ज्योती यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

त्यानंतर त्यांचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. घटनास्थळी खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी भेट दिली. पुढील तपास खडक पोलिस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!