Pune News : रक्षकच बनला भक्षक! पोलिसानी अल्पवयीन मुलीला घरी बोलावून केले ‘हे’ धक्कादायक कृत्य, पुण्यातील घटनेने उडाली खळबळ..


Pune News पुणे : पुणे पोलीस दलात पोलीस नाईक या पदावर कार्यरत असणाऱ्या एकाने अल्पवयीन मुलीला घरी बोलावून घेत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune News

केशव इरतकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस नाईकाचे नाव आहे. याप्रकरणी लोहगाव येथे राहणाऱ्या १७ वर्षाच्या मुलीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार शनिवारी (ता.१०) बी.एम.सी.सी रोडवरील एका इन्स्टिट्युच्या आवारात सकाळी साडे दहा ते साडे बाराच्या दरम्यान घडला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी केशव इरतकर हे विश्रामबाग पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये पीडित मुलीसोबत सेल्फी काढून तिच्यासोबत ओळख वाढवली. तिचा मोबाईल क्रमांक घेतला.

शनिवारी सकाळी मुलीला घरी भेटायला बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यासोबत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पीडित मुलीने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी केशव इरतकर याच्या विरोधात तक्रार दिली.

दरम्यान, पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून अद्याप त्याला अटक केलेली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!