Pune News : गाडीची काच फोडून बॅग चोरीतील सराईत आरोपीला यवत पोलिसांनी केले जेरबंद, ११ गुन्हे आले उघड..
Pune News :दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात हॉटेलसमोर असलेल्या पार्किंगमधून चारचाकी गाडीच्या काचा फोडून बॅगेची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला यवत पोलिसांनी जेरबंद केले. Pune News
मोहन चव्हाण (रा. कुंभारी, सोलापूर, सध्या रा. ठाणे, किशननगर, सेक्टर १२) असे जेरबंद करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, ८ ऑक्टोबर रोजी वाखारी गावाच्या हद्दीतील हॉटेल ‘निर्माण’ समोर उभ्या असलेल्या कारची पाठीमागची काच फोडून मोबाईलसह १९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा गुन्हा यवत पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला होता.
तसेच याप्रकरणीयवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी पाहणी करून सीसीटीव्ही कॅमेरे व रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासले असता, पथकाला संबंधित गुन्हा करण चव्हाण याने केल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर,यवत गुन्हे शोध पथकाने कुंभारी (जि. सोलापूर) येथून संशयितास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता आरोपी करण चव्हाण याने दौंड, सासवड व यवत पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक हॉटेलच्या पार्किंगमधून वाहनांच्या काच फोडून गाडीतील बॅग चोरून नेली असून, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण हद्दीतील ११ गुन्हे उघडकीस आले.
चोरीचा एकूण २ लाख ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी करण मोहन चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर पनवेल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.