Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात धक्कादायक प्रकार! विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, पोह्यांमध्ये अळी तर उपीटमध्ये केस…


Pune News : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापठात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थी खात असलेल्या पोह्यांमध्ये अळी तर उपीटमध्ये केस सापडले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

तसेच गेल्या वर्षभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. या सर्व प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापकांचा समावेश असलेली उपहारगृह व भोजनगृह दक्षता समिती तसेच विद्यार्थीचा समावेश असलेली भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समिती अशा दोन समित्या गठीत केल्या आहेत. या समितीमधील विद्यार्थी प्रतिनिधी अधूनमधून भोजनगृहास भेटी देतात.

आता पुन्हा एकदा मुलींच्या मेसमध्ये एका विद्यार्थ्यांनीच्या पोह्यांमध्ये आळी तर उपीट मध्ये केस दिसून आला आहे. विद्यापीठ प्रशासनाला थोडी जरी जनाची नाही तरी मनाची लाज वाटत असेल, तर त्यांनी आता तरी या सर्व प्रकावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशा खड्या शब्दांत विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला खडसावलं आहे. सर्व विद्यार्थी संघटना याविरोधात आवाज उठवतात. संबंधित मेस चालक बदला जातो. नवीन माणूस येतो. Pune News

परंतु जेवणाचा दर्जा मात्र सुटत नाही. आमची विद्यापीठ प्रशासनास नम्र विनंती आहे की त्यांनी आता यावर कायमस्वरूपीचा मार्ग काढावा. अन्यथा असे निकृष्ट दर्जाचे जेवण खाऊन विद्यार्थ्यांच्या जीवास काही धोका निर्माण झाला तर त्यास सर्वस्वी विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहिल, असंही विद्यार्थी म्हणाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!