Pune News : ‘धर याला चाव छू…; पिटबुल कुत्रा अंगावर सोडला, एकजण जखमी, मालकावर गुन्हा, पर्वती भागातील घटना..
Pune News पुणे : अंगावर सोडलेला पिटबुल जातीचा कुत्रा एका व्यक्तीला दोन ठिकाणी चावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुत्रा पाळणाऱ्या या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लक्ष्मी नगर परिसरात रविवारी (ता.२१) हा प्रकार घडला.
गणेश मेरूकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कुत्रा पाळणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रोहित मल्लाप्पा शिंगे यांनी तक्रार दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आरोपी गणेश मेरुकर यांनी पाळलेला पिटबुल जातीचा कुत्रा साखळी न लावता त्याला फिरण्यासाठी मोकळे सोडले होते.
यावर फिर्यादी यांनी कुत्र्याला साखळी लाव तो कोणाला तरी चालेल असे सांगितले. दरम्यान आपल्याला सांगितल्याचा राग आल्याने गणेश मेरुकर याने फिर्यादी तरुणाला शिवीगाळ केली. Pune News
फिर्यादीचा हात विरघळून त्याने त्याच्या पिटबुल जातीच्या कुत्र्याला “धर याला, चाव, छू…” असे सांगितले.. त्यानंतर पिटबुल जातीचा कुत्रा फिर्यादीचे अंगावर धावून गेला. फिर्यादीच्या उजव्या मांडीला दोन वेळेस चावला. यामध्ये फिर्यादी जखमी झाली असून त्यांच्या मनगटाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे.
या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निकाळजे अधिक तपास करत आहेत.