Pune News : पुण्यात भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन! माझी आवडती कार, माझा बाप बिल्डर असता तर…? कोणी केलं आयोजन?


Pune News : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी पोलिसांनी योग्य प्रकारे कार्यवाही न केल्याने सुरूवातीलाच कोर्टाने अल्पवयीन आरोपीला विविध मुद्द्यांचा विचार करून आणि काही अटी घालून जामीन दिला होता.

यामध्ये ३०० शब्दांचा एक निबंध लिहिण्यास देखील आरोपीला सांगितले होते. या निबंधावरून नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात होता. दोन व्यक्तींचा जीव गेल्यानंतर निबंध कसा लिहायला सांगितला, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

पुण्यातील आणि राज्यातील बडे राजकीय नेते या संपूर्ण प्रकरणावर फारसे बोलायला तयार नाहीत. केवळ काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरले आहे. यानंतर आता पुणे युवक काँग्रेसने चक्क राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. Pune News

पुणे युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेसाठी निवडण्यात आलेले विषय अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या स्पर्धेत प्रथम विजेत्याला ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. १७ वर्षे ८ महिने ते ५८ वर्षे वयोगटाचे नागरिक या स्पर्धेत भाग घेऊ शकतील. कल्याणीनगर परिसरात बॉलर पबसमोर रविवारी सकाळी ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते या स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक देण्यात येईल. या स्पर्धेची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. आता पुणेकर या स्पर्धेला कितपत प्रतिसाद देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

निबंध स्पर्धेचे विषय काय?
माझी आवडती कार ( पॉर्शे ,फरारी,मर्सिडीज,)
दारूचे दुष्परिणाम
माझा बाप बिल्डर असता तर?
मी खरंच पोलीस अधिकारी झालो तर?
अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण?

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!