Pune News : शाहाकारी पुणेकराने ऑर्डर केली पनीर बिर्याणी, त्यात सापडले चिकनचे तुकडे, तरुण संतापला, थेट…


Pune News : पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पुणेकराने पनीर बिर्याणीत चिकनचे तुकडे आढळल्याचा दावा केला आहे. या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे.

पंकज शुक्ला असे या पुणेकराचे नाव आहे.

पंकज शुक्ला याने पनीर बिर्याणीत चिकनचे तुकडे असल्याचा फोटो आणि व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा तरुण शाकाहारी आहे. घडलेल्या या प्रकारामुळे त्यांच्या भावना दुखावल्या असल्याचे त्याने ट्विटरवर लिहिले आहे. पुण्यातील कर्वे नगरयेथील प्रसिद्ध ह़ॉटेलमधून पंकज शुक्ला यांनी पनीर बिर्याणी मागवली होती.

त्यात थेट चिकनचे तुकडे सापडले. हे तुकडे पाहून शाकाहारी पुणेकर असलेला शुक्ला नावाचा तरुण संतापला आणि त्याने झोमॅटोकडे तक्रार केली त्यानंतर त्या रिफंड मिळाले आहेत मात्र त्याच्या धार्मिक भावना दुखावल्याचं त्याने ट्विटर पोस्टमध्ये लिहिले आहे. त्याने झोमॅटोकडे तक्रार दिली आहे. त्यावर झोमॅटोनेदेखील स्पष्टीकरण दिले आहे. Pune News

फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने आपल्या अधिकृत कस्टमर केअर अकाऊंटद्वारे शुक्ला यांच्या पोस्टला त्वरित प्रतिसाद दिला आणि आम्हाला कोणाच्या धार्मिक भावना दुखवायच्या नाही आणि तसा आमचा हेतूदेखील नाही. ग्राहक हे आमच्यासाठी प्रथम प्राधान्य आहे. तुम्ही तुमचा आयडी आणि फोन नंबर पाठवा आम्ही या संदर्भातील सगळी तपासणी करु, असे उत्तर झोमॅटोकडून देण्यात आले आहे.

अनेकांनी व्यक्त केला संताप…

या प्रकरानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी झोमॅटो अॅपवर तर अनेकांनी हॉटेल मालकावर संताप व्यक्त केला आहे. असे प्रकार घडतातच कसे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यासोबतच झोमॅटो साधं व्हेज आणि नॉन व्हेजचा वेगळेपणा जपता येत नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत एका युजरने झोमॅटो कंपनीवर संताप व्यक्त केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!