Pune News : श्रीमंतांच्या एका चुकीमुळे पुण्यात दोघांचे जीव गेले, एक आमदार आरोपीला वाचवतोय तर एक न्यायासाठी लढतोय….


Pune News : काल पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्री पहाटेच्या अडीच वाजता आलिशान पोर्शे कार मधून बांधकाम व्यवसायिकाचा दारुडा पोरगा त्याच्या मस्तीत गाडी चालवत असताना दोघांना उडवतो. आता हे प्रकरण राजकीय झाले आहे. एक आमदार तर हे प्रकरणच पोलिसांच्यात जाऊ नये म्हणून दबाव आणत आहे.

या आरोपीला पंधरा तासांतच जामीन मिळतो. बांधकाम व्यवसायिक विशाल अग्रवाल याचा मुलगा वेदांत याच्या हिट अँड रन मुळे आयटी अभियंता अनिस अवधिया व त्याची मैत्रीण अश्विनी कोष्टा या दोघांचा रविवारी पहाटे जीव गेला. मात्र मुलाला जामीन मिळवण्यासाठी किती प्रयत्न झाले. Pune News

पंधरा दिवस पोलिसांसोबत राहून रस्त्यावरचे नियम पाळावेत, त्याचबरोबर वाहतुकीच्या नियमांसाठी वेळ द्यावा निबंध लिहावा अशा अटी या सतरा वर्षाच्या पोराला कोर्टाने घालून दिलेल्या आहेत. एका आमदाराने या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून प्रयत्न केला. आज काँग्रेसचा आमदार पुण्याच्या येरवडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करणार आहे.

आमदार रवींद्र धंगेकर याबाबत आक्रमक झाले आहेत. त्यांनी यासंदर्भात पोलिसांवर ठपका ठेवला आहे. दोन निष्पाप जीवांचा जागीच मृत्यू झाला, तरी देखील पोलिसांनी त्या बांधकाम व्यवसायिकाची आणि त्याच्या मुलाची बाजू उचलून धरली. याबाबत जी कलमे लावणे गरजेची होती, ती लावली नाहीत.

यामुळे मुलगा लगेच सुटला. यामुळे धंगेकर आंदोलन करत आहेत. मोठ्याचे लेकरू काहीही करू शकतं असाच समज या निमित्ताने सामान्य लोकांमध्ये पसरला आहे. यामुळे ही व्यवस्था बदलणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. श्रीमंत लोकांना वेगळा आणि गरिबांना वेगळा न्याय, असं चित्र सध्या सगळीकडे आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!