Pune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी पाणी पूर्णपणे बंद राहणार, जाणून घ्या…

Pune News : पुणेशहरावर पाणी टंचाईचं संकट आहे. परंतु अजून पाणी कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. परंतु अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात कल्याणीनगर, कळस भागात गुरुवारी पाणी पुरवठा बंद असणार आहे.
भामा आसखेड प्रकल्पाचे अखत्यारीतील कुसमाडे वस्तीमधील नवीन टाकी ही मुख्य जलवाहिनीस जोडणे आणि ठाकरसी टाकीवरील स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करावं लागणार आहे.
त्यामुळे शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यासाठी येत्या गुरुवारी २९ फेब्रुवारीला पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. तर शुक्रवारी पाणी कमी दाबाने येणार आहे. Pune News
कोणत्या भागांमध्ये असणार पाणी पुरवठा बंद?
आदर्शनगर, कल्याणीनगर, हरीनगर , रामवाडी, शास्त्रीनगर, संपूर्ण गणेशनगर म्हस्के वस्ती परिसर , कळस, माळवाडी, जाधव वस्ती, विशाल परिसर, विश्रांतवाडी स. नं. 112 अ, कस्तुरबा, टिंगरेनगर पंप ते विश्रांतवाडी चौक, जयजवान नगर, जय प्रकाशनगर, संजय पार्क, एयर पोर्ट, यमुना नगर, दिनकर पठारे वस्ती, पराशर सोसायटी, श्री. पार्क, ठुबे पठारे नगर.