Pune News : पुण्यात परिचारिकेची गळफास घेऊन आत्महत्या, भयंकर कारण आलं समोर…


Pune News : अधिष्ठाता महिलेच्या त्रासामुळे एका खासगी रुग्णालयातील परिचारिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शिवणे भागात घडली आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी एका खासगी रुग्णालयातील अधिष्ठाता महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वैशाली सचिन गायकवाड- दिघे (वय. ३५, रा. विघ्नहर्ता रेसीडन्सी, दांगट पाटील इस्टेट, शिवणे, एनडीए रस्ता) असे आत्महत्या केलेल्या परिचारिकेचे नाव आहे. याप्रकणी वैशाली यांचे पती सुनील दिनकर दिघे (वय. ४२) यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वारजे भागातील एका खासगी रुग्णलायातील अधिष्ठाता उर्मिला शिरसाठ यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. Pune News

सविस्तर माहिती अशी की, वैशाली वारजे भागातील एका खासगी रुग्णालयात परिचारिका होत्या. त्यांचे पती सचिन मोटारीवर चालक म्हणून काम करतात. त्यांनी शिवणे परिसरात काही महिन्यांपूर्वी सदनिका खरेदी केली होती. खासगी रुग्णालयातील अधिष्ठाता शिरसाठ वैशालीला त्रास देत होत्या.

आर्थिक अडचणीमुळे वैशाली नोकरी सोडू शकत नव्हत्या. शिरसाठ यांच्या त्रासामुळे पत्नी वैशालीने नुकतीच राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे पती सुनील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पतीच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याची माहिती वारजे पोलिसांनी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!