Pune News : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आता म्हाडासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख..


Pune News पुणे : पुणेकरांसाठी एक महत्वाची माहिती आहे. गणेशोत्सव व कार्यालयीन सुट्टींमुळे अधिवास प्रमाणपत्र अथवा इतर आनुषंगिक कागदपत्रांची पूर्तता करण्यास नागरिकांना येत असलेली अडचण लक्षात घेऊन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. (Pune News)

त्यामुळे नागरीकांना २० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. म्हाडाचे पुणे विभागाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

पाटील म्हणाले, अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला तसेच ज्या आरक्षण असणाऱ्या वर्गातून अर्ज करत असल्यास त्याचे प्रमाणपत्र, असे पुरावे ऑनलाइन अर्जासोबत सादर करणे बंधनकारक केले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात नागरिक बाहेरगावी गेले असल्याने तसेच शासकीय सुट्टी असल्याने नागरिकांना प्रमाणपत्रे मिळण्यास विलंब होत होता. त्यामुळे अनेक अर्जदारांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. अर्जदारांची या अडचणी लक्षात घेऊन सोडतीसाठी नेमण्यात आलेल्या समितीने २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हाडाने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील पाच हजार ८६३ सदनिकांसाठी काढलेल्या सोडतीमध्ये आतापर्यंत ३२ हजार नागरीकांनी अर्ज केले. तसेच या घरांसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत गुरुवार (ता. २८) सप्टेंबरपर्यंत होती. गृहनिर्माण योजनेतील ४०३ सदनिका, पंतप्रधान आवास योजनेतील ४३१ सदनिका, १५ टक्के सामाजिक गृहयोजनेतील ३४४ सदनिका, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील दोन हजार ४४५ सदनिका आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत दोन हजार ४४५ सदनिका, अशा एकूण ५ हजार ८६३ सदनिकांसाठी सोडत जाहीर केली होती. त्यासाठी ५ सप्टेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!