Pune News : सासरचा नाहक जाच, विवाहितेने सगळं संपवलं, पुण्यातील वाघोली परिसरात भयंकर घटना….
Pune News : सासरकडील छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पुणे शहरातील वाघोली परिसरात घडली. तीसह सासू तसेच नणंदेविरोधात याप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रीती संजय शिंदे असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनंतर लोणीकंद पोलिसांनी पतीसह सासू तसेच नणंदेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, डिसेंबर २०२१ मध्ये प्रीतीचा विवाह संजय शिंदे याच्याशी झाला होता. काही दिवसांच्या सुखी संसारानंतर संजय आणि प्रीती यांच्यात वाद सुरू झाला. या वादात सासरकडील मंडळींनी सुद्धा उडी घेतली. त्यांनी प्रीतीचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला.
सासरकडील मंडळींकडून होत असलेल्या त्रासाची माहिती प्रीतीने आपल्या वडिलांना दिली होती. त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरी देखील पतीकडून प्रीतीचा मानसिक छळ सुरुच होता. Pune News
दरम्यान, त्रास असह्य झाल्याने प्रीतीने वाघोली येथील राहत्या घरात ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी संजय शिंदे, सासू इंदुमती शिंदे, नणंद प्रतिभा माळोदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.