Pune News : धक्कादायक! सासू सुनेला बोलली तू नकटी आहेस, सुनेला आला राग अन् चाकूने….

Pune News पुणे : पुणे शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासूने सुनेला नकटी म्हटले…त्यानंतर सुनेला प्रचंड राग आला. रागाच्या भरात तिने सासूवर चाकूने हल्ला केला. या घटनेत सासू गंभीर जखमी झाली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली.

घटना पुणे शहरातील येरवडा येथील गणेश नगरमध्ये घडली. याप्रकरणी सुने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासू-सुनेमधील या प्रकारानंतर परिसरातील अनेकांना धक्का बसला आहे. Pune News
संध्या अशोक मगर (वय ४५, रा. गणेश नगर, येरवडा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सुनेचे नाव आहे. तर मालनबाई परशुराम मगर (वय. ७५) असे जखमी झालेल्या सासूचे नाव आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, मगर कुटुंब येरवडा येथील गणेश नगरमध्ये राहतात. एकाच घरात राहत असल्यामुळे कधी कधी त्यांच्यात सासू-सुनेमधील भांडणासारखा प्रकार होतो. परंतु नुकताच धक्कादायक प्रकार घडला.
या दोघी घरामध्ये असताना संध्या ही मालनबाई यांना ‘तू नकटी आहेस’ असे बोलली. त्यावर मालनबाई यांनी सुद्धा चिडून तिला ‘तू पण नकटीच आहेस’ असे म्हटले.
आपणास नकटी म्हटल्याचा सून संध्या मगर यांना प्रचंड राग आला. तिने सासूबाईंना शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर हा प्रकार मारहाणपर्यंत गेला. त्यावेळी संध्या हिच्या हातामध्ये कांदा कापण्याची सुरी होती. तिच्याने हल्ला करत तिने मालनबाई यांना गंभीर जखमी केले.
मालनाबाई यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सासू मालनबाई हिने दिलेल्या फिर्यादीवरुन सुनेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.