Pune News : कोंढवा परिसरातील धक्कादायक घटना! जेवणाच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला घरी नेऊन बलात्कार, उडाली खळबळ…

Pune News : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

आईने जेवण करण्यासाठी घरी बोलवले असल्याचे सांगून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी नेले. त्याठीकाणी मुलीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याबाबत कुणाला सांगितले तर स्वत: आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना कोंढवा परिसरात घडली आहे.
याप्रकणी कोंढवा परिसरातील कामठे पाटील नगर येथे राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने गुरुवारी (ता. ८) कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार, विवेक रामकृष्ण निमकरडे (वय.१९ रा. येवलेवाडी, कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी आणि पीडित तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मुलगी येवलेवाडी येथील कॉलेजमध्ये गेली होती. त्यावेळी आरोपीने तुला माझ्या आईने जेवण करण्यासाठी घरी बोलवले असल्याचे सांगितले. तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून येवलेवाडी येथील त्याच्या घरी घेऊन गेला. Pune News
त्याठिकाणी मुलीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. मुलीने त्याला प्रतिकार केला असता तिला हाताने मारहाण केली. तसेच याबाबत घरी किंवा कोणाला काहीही सांगितले तर मी माझ्याच जीवाचे बरेवाईट करुन घेईल. तुला व तुझ्या घरच्यांना अडकविन अशी धमकी दिली. यानंतर दुचाकीवरुन घरी सोडल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबर करीत आहेत.