Pune News : मोठी बातमी! पुणे सोलापूर महामार्गावर सव्वा सहा कोटींचे मफेड्रॉन पकडले, ड्रग्स तयार करण्यासाठी लागणार कच्चा माल घावल्याने उडाली खळबळ..

Pune News पुणे : पुणे सोलापूर महामार्गावर दोन जणांकडून सहा कोटी दोन लाख रुपयांचे मेफेड्रॉन व त्यापासून ड्रग्स तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल दहा लाख 9 हजार रुपये असा ६ कोटी १२ लाख रुपयांचा अमली पदार्थांचा साठा पोलिसांनी जप्त केला. याप्रकणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. Pune News
दत्तात्रय लक्ष्मण घोडके (रा. मु.पो. औंढी ता. मोहोळ, जि. सोलापुर) , गणेश उत्तम घोडके (रा. औंढी ता. मोहोळ जि. सोलापुर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मोहोळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रदीप झालटे यांना १७ ऑक्टोबर रोजी त्यांच्या कार्यालयात खबऱ्यांकडून अशी माहिती मिळाली की, सोलापुर ते पुणे हायवे रस्त्यावर देवडी गावच्या फाट्यावर एका हॉटेलजवळ (ता. मोहोळ, जिल्हा. सोलापुर) येथे काहीजण मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विकी करण्याकPune News रीता येणार आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर झालटे यांनी मोहोळचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना याची माहिती दिली.
त्यानंतर घुगे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव व पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे यांना या संदर्भातील माहिती दिली त्यांच्या सूचनावरून सापळा रचला.
पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यातील साधे वेशातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके तयार करून, मागण्यांचे गटविकास अधिकारी महेश सुळे व दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत देवडी गावचे फाटयाजवळ मोहोळ येथे सापळा रचून ड्रग्ज तस्कर येण्याची वाट पाहत थांबले. तसेच रात्री १०.३० वा. च्या सुमारास एका चारचाकी गाडी हॉटेल साई समोरील मोकळया जागेत येऊन थांबली.
त्यामधील एक इसम पाठीवर सॅक अडकवुन गाडीतून खाली उतरून आजुबाजुच्या परिसराची पाहणी करू लागला असता, दबा धरून बसलेल्या साध्या वेशातील पोलीस त्याचे दिशेने जाऊ लागले. त्याला पोलीस आल्याची चाहुल लागल्याने तो घाईघाईत तेथून पळून जात असताना पोलीसांनी त्याला गराडा घालून जागेवरच पकडले .
विनोद घुगे यांनी महेश सुळे व पंचांचे समक्ष दत्तात्रय लक्ष्मण घोडके याचे ताब्यातील बॅगची झडती घेतली असता त्यांचे जवळ आंतरराष्ट्रीय बाजारात सहा कोटी पाच लाख चौदा हजार पाचशे रूपये किंमतीचे मफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, १ मोबाईल फोन व ३ हजार रुपयांची रोख रक्कम मिळून आली. त्याचा साथीदार गणेश उत्तम घोडके याची झाडती घेतली असता त्याचे जवळ २ मोबाईल व एक हुंदाई कार असा ऐवज मिळाल्याने त्या दोघांना ताब्यात घेतले व अटक केली.
दरम्यान, त्यांचेकडे तपास केला असता एस. एस. केमीकल लि. (२९/३० चंद्रमौळी एम. आय. डी.सी. मोहोळ) येथे ड्रग्ज बनवण्याचे साहित्य व कच्चा माल लपवून ठेवल्याचे सांगितल्याने पोलीसांनी सदर ठिकाणी छापे टाकले. तेथे त्या कारखान्यातून १० लाख ९ हजार ७०४ रूपयांचे मफेडॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ बनवण्याचा कच्चा माल जप्त केला.