Pune News : पतीकडून मानसिक शारीरिक छळ, जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीला पोलिसांनी केली अटक…


Pune News : पतीच्या सततच्या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (ता.१२) मोशी येथे घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

याप्रकणी मयत महिलेचा भाऊ धनंजय सुरेश जाधव (वय. ३३ रा. मु.शिरुर पो. कवठा ता. कंधार, जि. नांदेड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (ता.१४) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती विश्वंभर व्यंकटराव दुधाटे (वय. ३४ रा. कामठेवाडा, नागेश्वर मंदीराजवळ, मोशी मुळ रा. मु.पो. आरखेड ता. पालम जि. परभणी) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या बहिणीचा लग्न झाल्यानंतर दीड वर्षांनी मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. आरोपीने फिर्यादी यांच्या बहिणीला वारंवार मारहाण करत पैशांची मागणी केली. Pune News

सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून पत्नीने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पतीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अहिरे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!