Pune News : पहिल्या पतीचा मृत्यू झाल्याचे खोटं सांगून केलं लग्न, नंतर सोनं, गाडी, घर घेऊन केलं तिसर लग्न, पुण्यात धक्कादायक प्रकार झाला उघड…


Pune News पुणे : तिने आपल्या पहिल्या पतीचे निधन झाल्याचे सांगून तिने एका मौलानांशी दुसरा विवाह केला. त्यानंतर वर्षभरात त्याच्याकडील सोने, नाणे, गाडी, घर असे सर्व बळकावुन तिने तिसरा विवाह करुन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी कोंढवा येथील एका ५९ वर्षाच्या मौलाना यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आलीया नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ३१ ऑगस्ट २०२३ ते १५ डिसेंबर २०२४ दरम्यान कोंढव्यात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी हे एका मदरसामध्ये मौलाना आहेत. आरोपी महिलेने त्यांना आपल्या पहिल्या पतीचे निधन झाल्याचे खोटे सांगितले. आर्थिक फसवणुकीच्या हेतूने त्यांच्याशी लग्न केले. त्या पुणे व पालघर येथे जाऊन येऊन रहात होत्या. Pune News

या वर्षभरात फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी सोने, रोख रक्कम, गाडी, घर असा १४ लाख रुपयांचा ऐवज घेतला. त्यानंतर त्यांनी दुसर्‍याशी तिसरे लग्न केले.

दरम्यान, याचा फिर्यादी यांनी जाब विचारला असताना त्यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!