Pune News : मध्यरात्री विचारला पत्ता, कार साईडला घ्यायला लावली अन्…; पुण्यात घडली धक्कादायक घटना


Pune News पुणे :  दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.

पत्ता विचारण्यासाठी कार चालकाने गाडी साईडला घेतली असताना चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा प्रकार पाषाणमधील जाधव हाईटजवळ बुधवारी पहाटे सव्वा दोन वाजता घडला. Pune News

साहिल सुनिल गोडांबे (वय २१), योगेश लक्ष्मण जानकर (वय २७, दोघे रा.सोमेश्वरवाडी, पाषाण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मांजरी येथील एका ३२ वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी हे कार घेऊन जात होते. त्यांना पत्ता माहिती नसल्याने त्यांनी आरोपीला पत्ता विचारला. त्याने पत्ता न सांगता त्यांच्या गाडीत येऊन बसून माझा भाऊ येणार आहे, थोडीशी गाडी साईउला घेऊन बाजूला थांब असे सांगितले.

त्याप्रमाणे फिर्यादी बाजूला थांबले. काही वेळात एक जण मोटारसायकलवरुन आला. त्याने चाकूचा धाक दाखवून आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणत हाताने मारहाण करुन दारु पिण्यासाठी पैसे मागितले.

त्यांच्याकडून ३ हजार ३०० रुपये जबरदस्तीने घेऊन पळून जाऊ लागले. फिर्यादी यांनी आरडाओरडा केला. तेव्हा लोक जमले. त्यांच्याकडील चाकू पाहून ते पळून गेले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून या घटनेचा पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!