Pune News : हवेली तहसील मधील ‘किऑस्क मशीन बंद, मशीन सुरु करण्यासाठी प्रल्हाद वारघडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांसह तहसिलदार यांना निवेदन


Pune News पुणे : हवेली तहसील कार्यालयातील किऑस्क मशीन सुरु करावी अन्यथा ‘किऑस्क मशीनचा अंत्यविधी’ तहसील कार्यालयामध्ये केला जाईल असा इशारा अ.भा.मा.से. समितीचे प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद वारघडे पाटील यांनी तहसीलदार यांचेसह जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे दिला आहे. Pune News

शेतकऱ्यांना महसूल अभिलेख तात्काळ मिळण्यासाठी यासाठी हवेली तहसीलदार कार्यालयामध्ये किऑस्क मशीन बसवण्यात आली आहे. परंतु गेली आठ महिन्यांपासून बंद आहे. शेतकऱ्यांना सातबारा, फेरफार आदी महसुली अभिलेख मिळविण्यासाठी दिरंगाई होत असल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. मशीन सुरु करून मशीन चालवणेबाबत शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्यास शासनाचा महसूल देखील वाढणार आहे.

आठ महिन्यांपासून मशीन बंद असल्याने शेतकऱ्यांना महसूल अभिलेख काढण्यासाठी अनकेवेळा हेलपाटे मारावे लागतात असल्याने त्यांचा जातो वेळ व पैसा वाया जातो. दहा दिवसांमध्ये मशीन सुरु करावी अशी मागणी वारघडे पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

किऑस्क मशीन चालू करणेबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडून मंजुरीसाठी जमावबंदी आयुक्तालयाकडे पाठवण्यात आला आहे. – किरण सुरवसे (तहसीलदार, हवेली)

किऑस्क मशीनमुळे टोकन घेवून तात्काळ सातबारा, फेरफार आदी कागदपत्रे मिळत होती. परंतु मशीन बंद झाल्यापासून महसुली अभिलेख मिळवण्यासाठी गेली तीन महिन्यांपासून चकरा मारत आहे. – सोमनाथ आव्हाळे, शेतकरी

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!