Pune News : पुणे म्हाडाच्या घरांच्या सोडतीला अखेर मुहूर्त, लॉटरीची तारीखही ठरली, जाणून घ्या…


Pune News : म्हाडाच्या पुणे घरांसाठीची सोडत अखेर जाहीर झाली आहे. येत्या ०५ डिसेंबर २०२३ रोजी संगणकीय सोडतीत विजेत्यांची नावं घोषित केली जातील.

गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेतील ५८६३ घरांसाठी लॉटरी जाहीर झाली होती.

त्याची संगणकीय सोडत पुणे जिल्हा परिषद सभागृह येथे ०५ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे. Pune News

तसेच पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे दि. ०५ सप्टेंबर, २०२३ रोजी सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला. या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 5863 सदनिकांसाठी सुमारे ६० हजार अर्ज प्राप्त झाले .

अधिवास प्रमाणपत्र व इतर अनुषंगिक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वाढीव मुदत मिळण्यासाठी नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार व नागरिकांना सुविधा मिळावी यासाठी मंडळातर्फे सोडतीसाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!