Pune News : पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने वार, हल्लेखोर तरुणाबाबत मोठी माहिती आली समोर..
Pune News पुणे : एकतर्फी प्रेमातून सदाशिव पेठेत पेरूगेट पोलिस चौकीजवळ सकाळच्या वेळी तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली होती. तसेच या प्रकरणी आता मोठी माहिती समोर आली आहे. आरोपीला सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी जामीन मंजूर करण्यात आला आहे. Pune News
शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे.
जाधव याने २७ जून २०२३ रोजी सदाशिव पेठेत सकाळी दहाच्या सुमारास तरुणीवर कोयत्याने वार केले होते. लेशपाल जवळगे या तरुणाने प्रसंगावधान दाखवत या तरुणीचा जीव वाचवला होता.
प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला होता. भररस्त्यात हल्ल्याचा थरार पाहायला मिळाला होता. प्रेम संबंधास नकार दिल्याने आरोपीने तरुणीवर हल्ला केला होता.
त्या वेळी काही तरुणांनी आरोपी जाधवला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पीडित २० वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून जाधवच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून जाधव कोठडीत होता.
या आरोपीला ३ महिन्यानंतर जामीन मंजूर झाला आहे. त्याला तपास अधिकारी बोलवतील त्यावेळी तपासास हजर राहणे तसेच सात दिवसांत पासपोर्ट जमा करणे या अटींवर न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.