Pune News : लग्नानंतर पती निघाला गे! पत्नीला बसला धक्का, २ वर्षानंतर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

Pune News : लग्नानंतर आपला पती ‘गे’ असल्याची धक्कादायक माहिती पत्नीला समजली त्यानंतर तिला धक्काच बसला. ही घटना पुण्यातील मुंढवा परिसरात घडली आहे याबाबत सासरच्या लोकांना माहिती असताना त्यांनी सुनेपासून हा प्रकार लपवला.

तरीदेखील दोन वर्ष कसाबसा संसार केल्यानंतर देखील सासरच्या व्यक्तींनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली. शेवटी पिडीत महिलेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली


याप्रकरणी ३३ वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे. ही महिला मुंढवा परिसरात राहण्यास आहे. तिचा ३० वर्षीय पती, ६४ वर्षीय सासू, ४० वर्षीय नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार वानवडी येथील एका आलीशान सोसायटीत घडला.
पिडीत महिलेच्या फिर्यादीनुसार, तिचे लग्न जानेवारी २०२२ मध्ये झाले होते. तिचे सासर कर्नाटकमधील कारवार जिल्ह्यात आहे. लग्न करीत असताना महिलेपासून त्यांचा पती ‘गे’ असून त्याला पुरुषांमध्ये रस असल्याची माहिती लपवून ठेवण्यात आली. Pune News
तसेच त्याची समाजात ‘गे’ म्हणून ओळख निर्माण होऊन बदनामी होऊ नये याकरिता फिर्यादीसोबत लग्नाचे नाटक केले. यासोबतच या महिलेला घरातील सर्व कौटुंबिक खर्च करायला भाग पाडले. आरोपी पतीने त्याच्या आईचा देखील खर्च करण्यास भाग पाडले.
या महिलेला शरीरसुखापासून वंचित ठेवल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच, किरकोळ कारणावरून फिर्यादीला हाताने मारहाण करण्यात आली. तसेच, वारंवार शिवीगाळ करून मानसिक त्रास दिला. सासू आणि नणंदेने या महिलेला ‘आम्हाला तुझ्यापेक्षा श्रीमंत घरातील ४० तोळे सोने देणारी सून मिळाली असती.
दरम्यान, तुझ्या मुळे माझ्या मुलाचे आयुष्य खराब झाले.’ असे म्हणत सतत टोमणे मारून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास मुंढवा पोलीस करीत आहेत.
