Pune News : हडपसर- हिसार, दौंड- अजमेर रेल्वे फेऱ्यात वाढ, रेल्वे प्रशासनाचा निर्णय, प्रवाशांना होणार फायदा…


Pune News : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नाताळ व हिवाळी सुट्ट्या लक्षात घेता प्रवाशांच्या सोईसाठी आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे शासनाने महत्त्वाचा निर्णय घतला आहे.

या निर्णयानुसार, हडपसर-हिसार व दौंड-अजमेर या रेल्वे गाड्याच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

हडपसर-हिसार साप्ताहिक विशेष रेल्वे..

०४७२७ हडपसर-हिसार ही साप्ताहिक विशेष रेल्वे १६ डिसेंबर २०२४ म्हणजे आजपर्यंत धावणार होती. मात्र, आता या गाडीच्या सेवेत वाढ करण्यात आली असून, आता ही रेल्वे २३ व ३० डिसेंबर रोजी देखील हडपसरहून धावणार आहे.

तसेच हिसार-हडपसर साप्ताहिक विशेष रेल्वे (04723 ) ही रेल्वे गाडी पूर्वी १५ डिसेंबरपर्यंत धावणार होती, आता या गाडीच्या सेवेत देखील वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, ही गाडी आता २२ व २९ डिसेंबर २०२४ रोजी देखील धावणार आहे.

दरम्यान , गाडी क्रमांक ०९६२६ दौंड-अजमेर साप्ताहिक विशेष ही रेल्वे पूर्वी १३ डिसेंबर २०२४ पर्यंत धावणार होती, मात्र, आता या गाडीच्या सेवेत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार ही गाडी आता २० व २७ डिसेंबर २०२४ ला धावणार आहे. तसेच अजमेर-दौंड साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी क्रमांक 09625 ही रेल्वे पूर्वी १२ डिसेंबरपर्यंत धावणार होती. Pune News

या गाडीच्या सेवेत वाढ करत आता ही गाडी १९ आणि २६ डिसेंबर २०२४ रोजी देखील धावणार आहे. दरम्यान रेल्वेच्या थांब्यात व वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. फक्त सेवा वाढवण्यात आल्या आहे. प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय दिलासा देणारा आहे.

दरम्यान, नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर विशेष गाड्या देखील चालवण्यात येणार आहे. नाताळ सण, ३१ डिसेंबर आणि हिवाळी सुट्ट्या लक्षात घेता प्रवाशाची संख्या वाढली आहे. बहुतांश प्रवाशी हे रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे या प्रवाशांच्या सुविधेसाठी या गाड्यांच्या सेवा वाठवण्यात आल्या आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!