Pune News : तस्करीसाठी वाट्टेल ते..!! गुप्तांगात कॅप्सूल लपवून सोन्याची तस्करी, पुणे विमानतळावर ३३ लाखांचे सोने जप्त..
Pune News पुणे : सोन्याची भुकटी असलेली कॅप्सुल गुप्तांगात लपवून तस्करी करण्याचा प्रकार केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) उघडकीस आणला आहे. (Pune News)
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून दोन जणांना कस्टमच्या अधिकाऱ्यांना पकडले असून, त्यांच्याकडून ३३ लाख ३३ हजार रुपयांची ५५५ ग्रॅम सोन्याची भुकटी जप्त केली आहे. (Pune International Airport)
11.09.2023 को एसजी 52 द्वारा दुबई से पुणे आने वाले एक यात्री की प्रोफाइलिंग करने पर उसे रोका गया। पूछताछ के दौरान मलाशय में छिपाकर रखे गए सोने के पेस्ट के दो कैप्सूल बरामद किए गए, जिन्हें निकालने पर 33.93 लाख रुपये मूल्य का 555.6 ग्राम 24 कैरेट सोना जब्त किया गया। pic.twitter.com/o8ehIIjo1c
— Pune Customs (@PuneCustoms) September 13, 2023
मिळालेल्या माहिती नुसार, पुण्यातील लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Pune International Airport ) दुबईहून (Dubai) दोघे जण आले. यावेळी त्यांची हालचाल संशयास्पद आढळून आली. ते घाई घाई ने विमानतळाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. ही बाब विमानतळावरील कस्टमच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आली.
त्यांनी तात्काळ दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता, त्यांनी गुप्तांगात सोन्याची भुकटी असलेल्या कॅप्सुल लपवल्याचे आढळून आले.
कॅप्सुलमध्ये तब्बल ५५५ ग्रॅम सोन्याची भुकटी त्यांनी तस्करी करुन पुण्यात आणली होती. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी ही सोन्याची भुकटी जप्त केली आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत ३३ लाख ३३ हजार रुपये असल्याची माहिती आहे.