Pune News : पैशांसाठी मित्रच बनले शत्रू! ‘ते’ कृत्य करून नाचायला लावले अन् व्हिडिओही बनवला, घटनेने उडाली खळबळ..

Pune News : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

एका मित्राला नग्न करत त्याचा व्हिडीओ बनवला आणि तो गावातील मित्रांच्या ग्रृपवर शेअर केला. तसेच त्याच्याकडून ६० हजार रुपये काढून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तब्बल तीन ते चार महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune News
सोमनाथ कोंडीबा राजभोज, चंद्रकांत बबन लांडगे, संजय आत्माराम सुतार, सुभाष हनुमंत राव भोसले (सर्व रा. एकता हाऊसिंग सोसायटी येरवडा, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ते सध्या फरार असून त्यांच्या शोध सुरु आहे. या प्रकरणी ३३ वर्षीय पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, ही घटना पुण्यातील येरवडा भागातील आहे.आरोपीपैकी सोमनाथ राजभोज याने पीडित तरुणाला फोन करून तुझा भाऊ फ्लॅटवर आला असून, त्याला भेटण्यासाठी ये अशी बतावणी करत त्याला फ्लॅटवर बोलावले. तो आल्यानंतर आधी त्याला मारहाण करण्यात आली.
त्यानंतर त्याला नग्न करून काहींनी त्याचा त्याच अवस्थेत व्हिडीओ बनवला आणि तो व्हाटसअपवर शेअरसुद्धा केला. त्यानंतर तब्बल पाच महिने म्हणजे जुलै ते नोव्हेंबरपर्यंत ते सगळेजण पीडित तरुणाला व्हिडीओचा धाक दाखवून त्याच्याकडून पैसे उकळत असत.
या सगळ्या प्रकरणाला कंटाळून त्याने शेवटी पोलीस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू आहे.